top of page
Search

आमची भ्रमंती - वाई, महाराष्ट्र

Updated: Mar 8, 2021

वाई हे शहर सातारा पासून साधारणपणे ३५ की. मी. अंतरावर आहे. वाई शहराला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. पूर्वी याला “विराट नगरी” असेही म्हणत. ह्या शहरातील कृष्णा नदीवरील घाट हे पेशवे यांच्या काकाने म्हणजेच श्रीमंत रास्ते यांनी बांधलेले आहेत. मराठी विश्वकोश लिहिणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे वाईचेच. महाराष्ट्रामध्ये वाई हे घाट, कृष्णा नदी आणि देवळांसाठी प्रसिद्ध आहे. येथे गंगापुरी, मधी आळी, गणपती आळी, धरमपुरी, ब्राम्हणशाही, रामडोह आळी आणि भीमकुंड आळी असे ७ घाट असून १०५ वर्ष जुनी गोशाला ह्या ठिकाणी आहे. शहरातील “ढोल्या गणपती” हा गणपती घाटावर असून अतिशय प्रसिद्ध आहे. ह्या ठिकाणी कृष्णाबाई उत्सव मोठ्या प्रमाणत साजरा केला जातो व तो ४ ते ८ दिवस चालतो. चित्रपटांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. ह्या ठिकाणी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. पुण्यापासून साधारण ८०-९० की. मी. अंतरावर सातारा शहराच्या सीमारेषेजवळ असलेला हा निसर्गरम्य भाग उत्तम वीकेन्ड साठी उत्तम पर्याय आहे. थोडा जास्त वेळ ठेवला तर आपण जवळपासच्या अनेक ठिकाणांनाही भेट देऊ शकतो. रस्ते मधून मधून खराब आहेत पण एकूणच निसर्ग सानिध्यात प्रवासाचा क्षीण जाणवत नाही. पाहण्यासाठी काही महत्वाची ठिकाणे:

  1. पागा तालीम – अफजल खान आपल्या घोड्यांना या ठिकाणी ठेवत असे.

  2. ढोल्या गणपती मंदिर – श्रीमंत रास्ते यांनी बांधलेले १८ व्या शतकातील कृष्णा नदीच्या काठावरील हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे.

  3. गोशाळा – खूप गाई असलेली ११० वर्ष जुनी गोशाळा पाहण्यासारखी आहे.

  4. काशी विश्वेश्वर मंदिर – भगवान शंकराचे खूप जुने मंदिर अतिशय सुंदर असे आहे. याचे वैशिठ्य म्हणजे इथे असलेला नंदी हा ज्या दगडामधून महागणपती तयार केला त्याच दगडातून निर्माण केला आहे.

  5. कृष्णा घाट – अनेक देवळांसाठी प्रसिद्ध असलेला आणि कृष्णा नदीच्या काठावरील हा नयनरम्य परिसर आहे.

  6. धोम धरण – कृष्णा आणि कमंडलू नदीपासून तयार झालेले धोम धरण पाहण्यासारखे आहे.


#temple #wai #travel#traveldiaries #beautiful #maharashtra


3 views0 comments
bottom of page