top of page
Search

आमची भ्रमंती - पुणे- बंदीपूर-मुदुमलाई-मसिनागुडी-उटी- प्रवास तीन राज्यांमधुन

Updated: Mar 24, 2021

स्वतः च्या गाडीतून लांब प्रवासाला जाणे हि आमच्या तिघांची आवड...त्यात आत्तापर्यंत एवढया long trips केल्या आहेत...कि एक स्वतंत्र पुस्तक होईल. सुरुवात तर करूया ह्या प्रवासाच्या अनुभव कथनाला... अगदी आत्ता दिवाळीत केलेल्या long trip ने...

हा प्रवास सुरु केला आम्ही आमच्या S-Cross कार मधून पुण्यातून......महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू ह्या राज्यांमधून. एवढा मोठ्ठा प्रवास आणि गाडी योगेश ने एकट्यानेच चालवायची (मी काय लिंबू टिंबू driver) म्हणजे halt घेणे आलेच. मग आम्ही टप्पे आखले. वाटेतील बऱ्याच प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्यायचा होत्या. त्याप्रमाणे schedule तयार केले.


पहाटेच पुण्यातून निघालो. तसेही आम्ही बेळगाव पर्यंत आमच्या कार मधून बऱ्याच वेळेला गेलो आहोत. त्यामुळे नेहमीचाच माहितीचा रस्ता आहे. सातारा संपल्यावर कऱ्हाड लागले की नेहमीप्रमाणे कोयना दुध संघातून मस्तपैकी गार लस्सी, मसाला दुध असे झाल्यावर कोल्हापूर च्या दिशेने निघालो.


कोल्हापूर नंतर कर्नाटक राज्य चालू झाले कि रस्त्यांची स्थिती उत्तम आहे. त्यामुळे प्रवास थकवत नाही आणि अर्थातच आमची S-क्रॉस (long route ला खूपच comfortable!!!!). निप्पाणी मध्ये हॉटेल Goa Ves मध्ये उत्तम brunch झाल्यावर हुबळी च्या दिशेने निघालो. बेळगाव मध्ये संध्याकाळी पोचलो तेव्हा नेहमीच्या college cantin मध्ये मस्त authentic इडली सांबार, डोसा झाल्यावर चित्रदुर्ग साठी प्रवास चालू केला. एक halt दावणगिरी मध्ये करायचाच होता. दावणगिरी हे कर्नाटक मधील एक बऱ्यापैकी मोठे रेल्वे जंक्शन आहे. तसे गाव छोटे असल्यामुळे हॉटेल मिळायला वेळ लागला नाही. तशीही खूप रात्र झाल्यामुळे व भरपूर प्रवास झाल्यामुळे दमलो होतो. त्यामुळे रात्री जेवायला फक्त रस्सम भात...मस्त चवीचे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच निघालो...तेही typical दावणगिरी स्पंज डोसा, बेन्ने डोसा खाऊन च. (कानडी भाषेत बेन्ने म्हणजे लोणी....मी माहेरची कानडी असल्यामुळे जेव्हा जेव्हा कर्नाटकात प्रवासाला जातो तेव्हा भाषेचा काहीच प्रश्न येत नाही...) चित्रदुर्ग बघूनच पुढे जायचे होते त्यामुळे दावणगिरी ते चित्रदुर्ग अंतर लवकर पार करावे लागणार होते.


इतिहास


चित्रदुर्ग हा किल्ला बऱ्यापैकी मोठा आहे त्यामुळे सकाळी लवकरच बघायला सुरु करावा लागतो. जवळपासचे लोक one day trip म्हणूनही येतात. हा किल्ला सतराव्या आणि अठराव्या शतकात वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या काळात बांधला गेला जसे कि राष्ट्रकुट, चालुक्य, आणि होयसाल, तसेच विजयनगर साम्राज्यकर्ते इत्यादी. पण किल्ल्याचा golden era काळ हा Nayakas of Chitradurg किंवा Palegar Nayakas हाच. पुढे हैदर अली व त्याचा मुलगा टिपू सुलतान ह्यांनी किल्ल्यात अनेक बांधकामे व सुधारणा घडवल्या. हया किल्ल्याभोवती सात डोंगरांचा वेढा आहे व हे डोंगरांना सात पदरी भिंती आहेत त्यामुळे हा किल्ला अभेद्य समजला जात असे. महाभारताशी सुद्धा ह्या किल्ल्याचा संबंध आहे असे समजले जाते. त्यातील एक प्रसिद्ध कथा म्हणजे राक्षस हिडींब व त्याची बहिण हिडीम्बी हे ह्याच डोंगरावर राहत होते. जेव्हा पांडव येथे आले तेव्हा भीमाने हिडींब राक्षसाला मारून हिडीम्बी शी लग्न केले. त्यांचाच मुलगा म्हणजे घटोत्कच होय.


दुसरी कथा म्हणजे हनुमप्पा नावाच्या किल्लेदारच्या बायकोची..ओबाव्वा ची..किल्लेदार नवरा जेवणासाठी गेला असताना त्याच्या जागेवर किल्ल्याची राखण करता असताना हैदर अली च्या काही शिपायांनी किल्ल्यावरील गुप्त दरवाजातून प्रवेश करून आक्रमण केले तेव्हा एकटीने लाकडाच्या ओंडक्याने (म्हणजेच कानडीत ओणके) हल्ला करून ओबाव्वा ने काही सैनिकांना मारले व किल्ल्याला वाचवले. तिच्या ह्या धाडसाची आठवण म्हणून तिचा पुतळा चित्रदुर्ग जिल्ह्याच्या District Commissioner office समोर उभा केला आहे. किल्ल्यावर हि Onake Obavvana Kindi म्हणून जागा आहे.

किल्ल्याचे वरचा किल्ला आणि खालचा किल्ला असे भाग आहेत. वरच्या भागात एकूण १८ मंदिरे आहेत. त्यातील काही म्हणजे हिडीम्बेश्वारा, सिद्धेश्वरा, फाल्गुनेश्वरा, गोपालकृष्णा, हनुमान, नंदी, एक्नाथाम्मा इत्यादी.

खालच्या भागात Nayaka Palegar ह्यांच्या स्मरणार्थ मंदिर उत्सवाम्बा हे बांधले आहे. लिंगायत समाजाचा मुरुगाराजेंद्र मठ हा आधी किल्ल्यावर होता तो आता किल्ल्यापासून थोडा दूर नेला आहे. बंदिखाना (jail) बघता येतो.

Gunpowder grind करायचा दगड आपल्याला पाहता येतो. बऱ्याच ठिकाणी पूर्वीच्या काही खाणाखुणा जसे कि तोफा, पाणी व्यवस्थापन, इत्यादी पाहता येतात. तसा किल्ला बराच मोठा असल्याने ५-६ तास तर सहजच लागतात किल्ला फिरायला. बरोबर खाणे घेऊन जाणेच योग्य आणि हो चालायची आणि चढायची तयारी मात्र हवी.

अनेक अप्रतिम दगडी शिल्पांमुळे अनेक कानडी सिनेमांचे येथे शुटींग झाले आहे.

तर अशी हि चित्रदुर्ग पर्यंत चि वाटचाल तर छान झाली. आणि काही गोष्टी आहेत चित्रदुर्ग मध्ये बघायला पण वेळेच्या कमतरतेमुळे आम्ही फक्त किल्ला बघून पुढे निघालो. नाहीतर चित्रदुर्ग शहर व परिसर बघायला दोन दिवस तर सहजच लागतात त्यात आजूबाजूचे जलाशय, डोंगर, मंदिरे येतात.


टप्पा दुसरा


चित्रदुर्ग-हिरीवूर-तिप्तुर-कृष्णाराजपेट-म्हैसूर

अंतर-३५१ km

वेळ-१२ तास

किंवा

चित्रदुर्ग-हिरीवूर-सिरा-तुमकुर-कुणीगल-चन्नापत्ताना-मांड्या-म्हैसूर

अंतर-३५४ km

वेळ-१० तास

आम्ही दुसरा पर्याय निवडला.


आमचा दुसरा halt म्हैसूर मध्ये होता. म्हैसूर ला पोचतापोचता रात्रीचे ११ वाजले होते. पण online बुकिंग केल्यामुळे व गाडीतील GPS system मुळे हॉटेल Roopa International मध्ये विनासायास पोचलो. अगदी म्हैसूर Palace पासून १० मिनिटे आहे. म्हैसूर आधी पहिले असल्यामुळे व पुढचा पल्ला मोठा असल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघावे लागणार होते. त्यात चित्रदुर्ग चि पायपीट व १०-११ तासांचा प्रवास त्यामुळे थकून झोपी गेलो.


टप्पा तिसरा-


म्हैसूर-मसिनागुडी-उटी

आता म्हैसूर वरून आम्हाला कर्नाटक border cross करून तमिळनाडूत प्रवेश करायचा होता.

पहिला टप्पा होता Nanjangud रोड जो NH-212 Calicut (केरला) bound निलगिरी रोड आहे. पुढे Gundlupet गाव लागते व इथे रस्त्याला दोन फाटे फुटतात. हा आहे NH ६७. एक रस्ता जातो Calicut (केरला) व दुसरा जातो बंदीपूर अभयारण्य व उटी. आम्ही मसिनागुडी ला जाण्यासाठी NH67 continue केला. हा प्रवास साधारण दीड-दोन तासांचा होता. मधेच हुंगाला नावाचे गाव आहे, तिथे गोपालस्वामी मंदिर हे खूपच प्रसिद्ध मंदिर आहे पण हे एका डोंगरावर आहे त्याचे नाव आहे हिमावाद गोपालस्वामी Betta (कानडीत betta म्हणजे डोंगर.) हे ठिकाण आम्ही येताना बघितले. गावापासून साधारण हे Gundlupet गावापासून १० km आहे. आपण डोंगराच्या पायथ्यापाशीस जाऊ शकतो. पण पुढे वर मंदिरात जाण्यासाठी ५ km रस्ता हा जंगल भाग असल्यामुळे व दाट धुके असल्यामुळे व धोकादायक रस्ता असल्यामुळे forest department च्या बसेस मधूनच तिकीट काढून जावे लागते. आपल्या गाड्या नेऊन देत नाहीत. हा प्रवास म्हणजे निसर्गाचा सुंदर अनुभव आहे.. धुके, दाट झाडी, वळणावळणाचा रस्ता, व थंड हवा, थोडा हलका पाऊस अश्या वातावरणात कधी डोंगरावरील मंदिरात पोचतो कळतच नाही. वेळ सकाळी ८:३० पासून दुपारी ४ पर्यंतच आहे. हे मंदिर होयसाला राजा बल्लाळ यांनी बांधले नंतर म्हैसूर राजा वाडियार जे कृष्णभक्त होते यांनी मंदिराचा सांभाळ केला व जतन केले.

पुराणात असेही सांगितले आहे कि मुनी अगस्त्य यांनी भगवान विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी येथे तपश्चर्या केली होती व भगवान विष्णू प्रसन्न झाल्यावर त्यांनी भगवान विष्णू ह्यांनी येथे निवास करावा असे मागून घेतले त्यामुळे ह्या डोंगरावर कृष्ण रुपात विष्णूचे स्थान आहे.

आम्ही मंदिरात पोचल्यावर खूप थंडी व धुके होते, गाभाऱ्यात गेल्यावर कृष्णाला अभिषेक करून मस्त असा पुलीओगेरे भात प्रसाद म्हणून खाल्ला. बस अर्धा तास थांबते व परत सर्व प्रवासी खाली उतरतात. अशा दिवसभरात खूप खेपा होतात. पण एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून जरूर भेट द्यावी. निसर्ग तर फारच अप्रतिम आहे. बंदीपूर अभयारण्य चा भाग असल्यामुळे येताजाता जंगलात काही प्राणी सुद्धा दिसतात जसे कि हत्ती, हरणे व आसपासचा परिसर, दरी, खूपच मनोवेधक आहे. हा पूर्ण भाग हा tiger reserve आहे.

तर आता गोपालस्वामी मंदिर झाल्यावर बंदीपूर National Park चि हद्द चालू होते. Security चेक झाल्यावर पहिल्यांदा दिसते ते Pugmark Restaurant, व forest dormitories. जिथे राहण्याची सोय आहे. तुलना करायची झाल्यास Pugmark Restaurant हे फारच महाग आहे.

आता आम्ही जंगल भागात प्रवास सुरु केला व वातावरण एकदम बदलले....हळू हळू पुढे जाऊ तसे हरीणांचे कळप, हत्तींचे कळप, ससे, काळवीट, मोर, दिसू लागले आणि आभा तर एकदम खुश झाली, शेवटी zoo मधले प्राणी पाहणं व जंगलातील प्राणी पाहणे ह्यात फरक असतोच. गाड्या फारच हळू जात होत्या, मधेच फोटो हि काढावे म्हणून बरेच लोक थांबले होते. जागोजागी सावधानी साठी फलक होते कारण दाट जंगल असल्यामुळे खाली उतरू नये, प्राण्यांना त्रास देऊ नये, हॉर्न वाजवू नये, हि काळजी घ्यावी लागत होती. Bandipur National Park हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे लोक वाघ दिसतोय का म्हणून सर्वत्र पाहत होते. दाट झाडीमुळे खूपच गार हवा होती. आम्ही भरपूर फोटो काढले. खूपच दाट जंगलात जायचे असले तर मात्र forest department च्या वाहनांनी जावे लागते. आम्ही काही deep forest सफारी केली नाही पण पूर्ण रस्ताच जंगल असल्यामुळे सफारीचा अनुभव घेतला. Bandipur एन्ट्री gate पासून ८-१० km रस्ता आहे पुढे Mudumalai (तामिळनाडू) ला जायला.

एक जंगल संपले व दुसरे (Mudumalai National Park) चालू झाले. Border crossing झाल्यावर तामिळनाडू सुरु झाले. तसे जंगल एकच आहे पण कर्नाटक राज्यात त्याला Bandipur National Park म्हणून ओळखतात व तामिळनाडू मध्ये Mudumalai National Park म्हणून ओळखतात. अभयारण्याच्या आत ५ km गेल्यावर Theppakadu elephant camp आहे. इथूनच उटी ला जायला दोन रस्ते आहेत. एक म्हणजे मासिनागुडी मधून NH 67, व दुसरा आहे गुडलूर गावातून जाणारा. मुख्य वर्दळ हि गुडलूर मार्गेच असते पण हौशी पर्यटकांना आणि ज्यांना गाडी चालवण्याची खरी आवड आहे अशांना खुणावतो तो मासिनागुडी चाच रस्ता. ह्या रस्त्यावर बरेच सफारी points, forest guest houses, व elephant camp आहेत. आम्हाला मासिनागुडी ला जायचेच होते त्यामुळे आम्ही Theppakadu elephant camp वरून पुढे लेफ्ट turn घेतला. डावीकडे मोठा landmark म्हणजेच Ari Gowder Bridge दिसला जो १९३९ मध्ये बांधला आहे. साधारण ८ km नंतर आम्ही मासिनागुडी ला पोचलो. मासिनागुडी हे तमिळनाडूतील एक प्रसिद्ध trekking point आहे. येथे बरेच homstays, resorts आहेत. हा पूर्ण भाग जंगल area आहे. गाव तसे खेडेगावच आहे पण निसर्गसान्निध्यात राहायचे असेल तर खूपच सुंदर आहे. राहायची व खायची सोय खूपच छान आहे.

मासिनागुडीला पोचता पोचता रात्र झाली होती. The Nest Inn मधला आमचा stay खूपच अविस्मरणीय होता. गावात बघण्यासारखे म्हणजे Moyar नदीवरचा Moyar dam, Pyakara dam, Moyar falls, आजूबाजूचे जंगल कॅम्पस, elephent कॅम्पस, इत्यादी आहे. पुष्कळ चहा कॉफ्फी चे मळे आहेत ज्याला आपण भेट देऊ शकतो. निलगिरी ची तर जंगले च आहेत. मासिनागुडी हे ठिकाण गोपालस्वामी betta, उटी , जंगल सफारी ह्यासाठी एक मस्त पर्याय आहे. मात्र त्यासाठी stay २-३ दिवस असावा.

मासिनागुडी सोडल्यावर साधारण ७-८ km नंतर उटी साठी चा घाटरस्ता सुरु होतो. पूर्ण रस्ता म्हणजे साधारण २२ km आहे पण अतिशय अवघड वळणे असल्यामुळे जरा जास्त वेळ लागतो उटीला पोचायला. अतिशय टोकाची वळणे (hairpin bends) एकूण ३६ आहेत व एकापुढे एक अशी लगेचच असल्यामुळे गाडी चालवणारा कुशल च हवा व मी म्हटल्याप्रमाणे अशा ठिकाणी गाडी चालवण्याची आवडच हवी. कारण रस्ते पण खूपच रुंद आहेत. त्यामुळे खूपच जपून गाडी चालवावी लागते. गाडी तर compulsry पहिल्या व दुसरया gear मधेच चालवावी लागते.. तसे फलक जागोजागी लावलेले आहेत. जराजरी तुम्ही गोंधळलात किवा engine बंद झाले तर गाडी लगोलग मागेच येऊ लागते..... पण निसर्ग म्हणजे काय ते ह्या रस्त्यावरच कळते. सर्व आसमंतात निलगिरीचा सुवास भरून राहिला होता. बरोबरीला चहा कॉफीचे मळे, इथल्या लोकांना सर्दी पडसे होतच नसेल बहुतेक. निलगिरी चि उंच व दाट झाडी, डोंगररांगा, दऱ्या .. खूपच सुंदर प्रवास पण तितकाच भीतीदायक हि अर्थातच आमच्या दोघींसाठी, योगेश नि तर पुरेपूर आनंद घेतला ह्या रस्त्याचा..व गाडी चालवण्याचा.....फोटो काढण्याचा. पण हा रस्ता मासिनागुडी ते उटी हा रात्री सुरक्षेच्या कारणास्तव बंद असतो. घाटाच्या मध्याला म्हणजे उटी साधारण १० km असताना Kalhatti म्हणून एक point आहे. धबधबा आहे. अगदी उंच असा भाग असल्यामुळे ढग आपल्या अगदी जवळच आहेत असा भास होतो. पूर्ण भाग दाट धुक्यानी वेढला होता. . इतका कि समोरचे वाहन, रस्ता दिसत नव्हता. ह्या पूर्ण भागाला The Niligiris म्हणूनही ओळखले जाते.

घाट संपल्यावर धुक्याने वेढलेल्या, निलगिरी पर्वताच्या कुशीत वसलेल्या उटी चे मनोहारी दर्शन झाले व उटी ला Queen of Hill stations का म्हणतात ते लक्षात आले व प्रवासाचा क्षीण कुठल्याकुठे पळून गेला. उटी ला Udhagmandalam असेही नाव आहे. आभा पहिल्यांदाच उटी मध्ये आल्यामुळे फारच मजेत होती. हा आमच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा होता. उटी मधील काही points बघून आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार होतो. थंडीच्या दिवसात गेल्यामुळे व डोंगरात असल्यामुळे हवा खूपच थंड होती. आम्ही दुसऱ्या दिवशी उटी sightseeing केले. त्यात Botanical Garden, Ooti Lake, mini rail, tea and coffee plantation, चा समावेश होता.


उटी पासून Mettupalayam पर्यंत एक रेल्वे route आहे जो UNESCOनी World Herritage Site म्हणून declare केला आहे. हि रेल्वे The Nilgiri Mountain Railway म्हणून ओळखली जाते. पूर्ण रस्ता निलगिरी पर्वतांच्या रांगांमधून दाट जंगलामधून जातो. खूपच सुंदर प्रवास आहे ह्या ट्रेन चा. वाटेत Kellar, Coonoor, Wellington, Lovedale इत्यादी छोटी पण सुंदर हिल स्टेशन लागतात. हा प्रवास पूर्ण करायला साधारण ५ तास लागतात. railway स्पीड साधारण २० kmph असतो त्यामुळे वाटेत आपल्याला sightseeing करत जाता येते. पण ह्यासाठी महिनोंमहिने आधी booking करावे लागते.

शेवटी मार्केट मध्ये spices, homemade chocolates, nilgiri oil, herbal oil, tea, coffee अशा बऱ्याच गोष्टींचे मनसोक्त shopping केले.


रात्र झाली होती. दुसऱ्या दिवशीपासून परतीचा प्रवास होता.

सकाळी लवकरच उटी सोडले व घाटरस्ता वगळून गुडलूर मार्गे प्रवास सुरु केला. वाटेत एक प्रसिद्ध शुटींग point बघितला. अप्रतिम. बऱ्याच हिंदी, तमिळ, कानडी फिल्म्स चे शुटींग येथे झाले आहे.

येताना चा प्रवास खूपच मोठ्ठा होता. halt direct दावणगिरी लाच करायचा होता. १२-१४ तासांचा प्रवास होता. त्यामुळे मध्ये बरेच shortcuts घ्यावे लागले. कारण mudumalai व बंदीपूर दोन्ही जंगल भाग दिवसा उजेडीच पार करायचा होता. शेवटी परतीचे वेध लागलेच होते व आता sightseeing करायचे नसल्यामुळे वेगात टप्पे ओलांडत आम्ही चित्रदुर्ग पर्यंत पोचलो तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते. दावणगिरी पर्यंत पोचायला अजून २ तास तरी लागणार होते म्हणजेच रात्री साधारण १ वाजणार होते हॉटेल वर जायला व लगेच सकाळी निघायचे होते ...मग आम्ही एक निर्णय घेतला तो म्हणजे जवळच एका टोलनाक्यावर थोडावेळ विश्रांती घ्यायचा व व तसे आम्ही केलेही!!! गाडी पार्क करून गाडीच्या seats मागे ओढून आम्ही मस्त ताणून दिले. खरच आम्ही truck driver प्रमाणेच केले. १२-१४ तास nonstop drive करून योगेश व नुसतेच बसून आम्ही दोघी दमलो होतो!!! ह्याला वेडे म्हणावे किवा काय हे ज्याने त्याने ठरवावे!!!! मग सकाळी दावणगिरी टोल नका सोडल्यावर पुन्हा हुबळी, बेळगाव, निप्पाणी, कोल्हापूर, सातारा मार्गे आम्ही पुण्याला पोचलो.


#jungle #Forest #masinagudi #travel #traveldiaries #beautiful


14 views0 comments
bottom of page