आमची भ्रमंती - चिखलदरा, अमरावती, महाराष्ट्र
Updated: Mar 9, 2021
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून ते अमरावती जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येते. सन १८२३ मध्ये हैदराबाद रेजिमेंट मधील Captain Robinson ह्याने चिखलदरा शोधून काढले. ह्या इंग्रजाने हे शोधून काढायचे कारण म्हणजे हे ठिकाण त्याला इंग्लंड मधील हिरव्यागार ठिकाणांची आठवण करून देणारे होते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या पान गळतीमुळे त्याला इंग्लंड मधील हिवाळ्याची आठवण होत होती.
ह्या ठिकाणी महाभारतामधील एक महत्वाचा प्रसंग घडलेला आहे. ह्या ठिकाणी भीमाने कीचकाचा वध करून त्याला खोल दरीत टाकून दिले होते. त्यामुळे ह्या ठिकाणाला किचकदरा असे नाव पडले आणि नंतर त्याचे चिखलदरा असे नामांतरण झाले.
हे ठिकाण विदर्भामध्ये येते. येथे अनेक प्रकारचे वन्य जीव आढळतात. या ठिकाणाहून जवळच अतिशय प्रसिद्ध असा मेळघाट वाघ प्रकल्प आहे.
या ठिकाणी पाऊस बराच पडतो. साधारणपणे वर्षभरामध्ये येथे १५४ से. मी. पाऊस पडतो.
उन्हाळ्यामध्ये येथे साधारणपणे तापमान ३९ डिग्री असते तर हिवाळ्यामध्ये ते ५ अंश पर्यंत खाली जाते. या ठिकाणी भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते जुन महिने उत्तम आहेत.
या ठिकाणी पाहण्यासाठी खालील ठिकाणे प्रसिद्ध आहेत.
१. किचकदरी किवा भीमकुंड
२. वैराट देवी
३. सन सेट point
४. बीर धरण
५. पंचबोल point
६. कालापाणी धरण
७. महादेव मंदिर
८. सीमा डोह वाघ प्रकल्प
९. हरिकेन point
१०. मोझरी point
११. देवी point
१२. गोरा घाट
१३. शक्कर तलाव
१४. मालवीय आणि सूर्योदय point
१५. शासनाची बाग
१६. धबधबे
१७. पंच धारा धबधबा
१८. गाविलगड किल्ला
१९. मुक्तागिरी
येथे जाण्यासाठी चारचाकी वाहनाने जाता येते. तसेच येथे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाची बस स्वारगेट पासून उपलब्ध आहे.
पुणे -- अहमदनगर -- औरंगाबाद --बुलढाणा -- नांदुरा -- जळगाव -- अकोट -- अंजनगाव -- चिखलदरा. - अंतर अंदाजे ५९५ कि.मी.
पुणे -- अहमदनगर --अंबड -- जालना -- चिखली -- खामगाव -- शेगाव -- अकोट -- अंजनगाव -- चिखलदरा. - अंतर अंदाजे ५९२ कि.मी.
पुणे -- पाटस -- दौंड --शिर्गौंदा -- जामखेड -- बीड -- अंबड -- शेगाव -- अकोट -- अंजनगाव -- चिखलदरा. - अंतर अंदाजे ६४७ कि.मी.
पूर्ण रस्त्यात बऱ्यापैकी छोटी छोटी गावे लागतात व छोटी छोटी हॉटेल्स आहेत. यामध्ये अहमदनगर च्या आधी हॉटेल कामत नाश्त्यासाठी चांगले आहे. औरंगाबाद मध्ये खूप छान जेवण मिळू शकते. जर शेगाव कडून गेलात तर शेगाव ची प्रसिद्ध कचोरी खायलाच हवी. त्यानंतर वाटेत अशी बारीक ठिकाणे आहेत जिथे मस्तपैकी पोटपूजा होऊ शकते.
जाताना शेगावकडून गेलात तर शेगाव मध्ये राहण्याची उत्तम सोय होते. फक्त जाताना बुकिंग करणे आवश्यक.
चिखलदरा येथे अनेक राहण्याची ठिकाणे आहेत. अनेक ठिकाणांचे इंटरनेट वरून बुकिंग करणे पण शक्य आहे. आपल्या आवडीप्रमाणे व बजेट प्रमाणे राहण्याची सोय अतिशय छान होऊ शकते.
हॉटेल हर्षवर्धन - http://harshawardhan.com
हॉटेल सापुतारा - www.satpuraretreat.com
मेळघाट वाघ प्रकल्प - http://melghattiger.gov.in
तसेच Maharashtra tourism development corporation च्या हॉटेल मध्ये राहण्याची उत्तम सोय होते.
#nature #chikhaldara #travel#traveldiaries #beautiful #maharashtra #cold #hillstation