top of page
Search

SmarTechnic - ओळख तंत्रज्ञानाची

कोरोनामुळे सगळीकडे आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचीच चर्चा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या 'वर्क फ्रॉम होम' मुळे अनेक कंपन्यांनी आपली शक्य तितकी कामं आणि बैठका ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करायला सुरुवात केली. विद्यार्थी पण मागे न राहता आता शाळेचा अभ्यास संगणकावरून किंवा मोबाईलवरून ऑनलाईन करू लागले. व्हाट्सपअ‍ॅप वरून अनेकजण विडिओ कॉलिंग करत होतेच, पण त्याला पण मर्यादा असल्यामुळे आता अनेक अ‍ॅप्स लोकप्रिय होऊ लागली. 'स्काईप' याबाबतीत लोकप्रिय होतंच. मात्र त्याचबरोबर या स्पर्धेत 'झूम' सारखी अ‍ॅप्ससुद्धा उतरली. सहजसोप्या युजर इंटरफेसमुळे 'झूम' अल्पावधीतच लोकप्रियही झाले. खरंतर शोधल्यावर अनेक अ‍ॅप्स मिळतील पण म्हणूनच मी या ठिकाणी लोकप्रिय असलेली आणि वापरुन पाहिलेली चांगली पाच मोफत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप्स सांगणार आहे ज्यामुळे आपल्याला "झूम" शिवाय बाकीचे पर्याय पण मिळतील.

खरंतर शोधल्यावर अनेक अ‍ॅप्स मिळतील पण म्हणूनच मी या ठिकाणी लोकप्रिय असलेली आणि वापरुन पाहिलेली चांगली पाच मोफत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप्स सांगणार आहे ज्यामुळे आपल्याला "झूम" शिवाय बाकीचे पर्याय पण मिळतील.

१. मीट नाऊ - एकाचवेळी ५० पर्यंत लोकांना ह्यामध्ये सहभागी करून घेता येते. स्काईपवर नसलेल्या आणि स्काईप कॉन्टॅक्ट वापरणाऱ्यांना मीट नाऊ आमंत्रित करते. ज्यांना मीटिंग मध्ये सहभागी होयचे आहे ते सहजपणे सामील होऊ शकतात. मीटिंग सुरु असताना मागील काही संदर्भ पाहणे, कोण कोण उपस्थित आहे ते पाहणे तसेच कॉल रेकॉर्डिंग पण ह्यामध्ये सहजतेने होते. आपले मायक्रोफोन बंद किंवा चालू करू शकता आणि आलेल्या कॉलला प्रतिक्रिया पाठवू शकतात. मीट नाऊ हे अ‍ॅप 30 दिवसांपर्यंत रेकॉर्डिंग संग्रहित करून ठेवू शकते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कॉलमध्ये प्रेसेंटेशन्स आणि डिझाइन देखील आपण दाखवू शकतो.

२. सिस्को वेबेक्स - एकाचवेळी १०० पर्यंत लोकांना ह्यामध्ये सहभागी करून घेता येते. हे सगळ्यांसाठी फक्त फ्री च नाहीये तर इथे वेळेची कोणतीही मर्यादा नाहीये. तसेच ह्यामध्ये व्हॉईस-ओव्हर-इंटरनेट-प्रोटोकॉल (व्हीओआयपी) क्षमतेसह टोल डायल-इनसह सर्व वैशिष्ट्ये आहेत. यामध्येही मायक्रोफोन व व्हिडिओ बंद किंवा चालू करू शकतो आणि आपला स्क्रीन पण दुसऱ्याला दाखवू शकतो. इथून मीटिंग्ज सुरू करण्यासाठी आपल्याला सिस्को वेबॅक्स पोर्टलवर साइन अप करणे आवश्यक आहे. एकंदरीत, झूमशी तुलना करताना सिस्को वेबेक्स चा अनुभव खूपच चांगला आहे.

3. मायक्रोसॉफ्ट टीम - हे अ‍ॅप फ्री आहे आणि एकाचवेळी २५० पर्यंत लोकांना ह्यामध्ये सहभागी करून घेता येते. फक्त व्हिडिओ कॉल करण्यासाठी उपाय नको असल्यास आपण मायक्रोसॉफ्ट टीमकडे पाहू शकता. हे अ‍ॅप सगळ्यांसाठी फक्त फ्री च नाहीये तर इथेही अमर्यादित चॅट आणि सर्च, ग्रुप आणि दोघांमध्ये (one on one) व्हिडिओ कॉलिंग आणि प्रति व्यक्ती 2 जीबी वैयक्तिक फाइल स्टोरेजसह 10 जीबी टीम फाईल स्टोरेज मिळते. आपल्याकडे जर आधीपासूनच मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365 असल्यास आपल्याला वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट आणि वन नोटसह वेबसाठी लागणाऱ्या सगळ्या अ‍ॅप्सची मदत मिळते.

४. गुगल हॅन्गआउट मीट - एकाचवेळी १५० पर्यंत लोकांना ह्यामध्ये सहभागी करून घेता येते. भरपूर सुरक्षितता, जगभरात जगभरात असणारे नेटवर्क जाळे आणि आपला डेटा सुरक्षित ठेवण्याचे काम हे अ‍ॅप करते. यामध्ये मीटिंग ठरवून लिंक पाठविली कि झाले, मग मीटिंग मध्ये येणाऱ्याकडे अ‍ॅप नसेल तरी चालते. समजायला आणि वापरायला अतिशय सोपे असे हे अ‍ॅप जी सूट तर्फे चालवले जात असल्याने ते कॅलेंडर बरोबर जोडले जाते. तुम्हाला ई मेल देखील मिळते. तसेच हे कॉम्पुटर आणि मोबाईल वरून देखील वापरले जाते. यामध्ये कोण कोण उपस्थित आहे ते पाहू शकतो तसेच आपले मायक्रोफोन व व्हिडिओ बंद किंवा चालू करणे, आपला स्क्रीन दुसऱ्याला दाखवणे हे पर्याय उपलब्ध आहेत. जी सूट असेल तर कॉल रेकॉर्डिंग पण ह्यामध्ये सहजतेने होते.

५. डिसकॉर्ड - एकाचवेळी ५० पर्यंत लोकांना ह्यामध्ये सहभागी करून घेता येते. झूमला डिसकॉर्ड हा एक मजबूत पर्याय म्हणून देखील उदयास आला आहे. हे अ‍ॅप प्लॅटफॉर्म गेमर्समध्ये लोकप्रिय आहे. आपण आपल्या ऑफिस टीम किंवा काही मित्रांशी संवाद साधण्यासाठी हे एक साधन म्हणून वापरू शकता. मोबाइल अ‍ॅप जर डाउनलोड केले तर आपल्या स्मार्टफोन वरून कॉन्टॅक्ट लिस्ट शी संपर्क साधू शकता. आपली स्क्रीन दुसऱ्याला दाखविता येते आणि व्हॉईस कॉल करण्यासाठी वैशिष्ट्ये देखील यामध्ये आहेत. आपल्या व्हर्च्युअल कॉन्फरन्सला सुरुवात करण्यासाठी आपल्याला फक्त डिसकॉर्ड साइटवर किंवा त्याच्या अ‍ॅपद्वारे साइन अप करणे आवश्यक आहे.

प्रो. डॉ. योगेश बोकील


#Online #learningexperience #computer #internet #connectivity #challenging8 views0 comments
bottom of page