top of page
Search

आमची भ्रमंती - दांडेली, कर्नाटक

Updated: Mar 9, 2021

दांडेली हे उत्तर कर्नाटकातील एक छोटेसे गाव, जे पश्चिम घाटातील दाट गर्द हिरव्यागार जंगलामध्ये, काली, कानेरी, ह्या नद्यांकाठी वसलेले आहे. दांडेली हे जंगल सफारी तसेच eco-tourism व भरपूर adventurous sports activities साठी प्रसिद्ध आहे जसे कि white river rafting, rappelling, jungle safari, kayaking, canyoning, night camping etc. हे जंगल साधारण 834.16 sq. km मध्ये पसरलेले आहे व कर्नाटकातील दुसरी मोठी wildlife sanctuary आहे. इतर अनेक जंगलाप्रमाणे येथील जैववैविध्य मनाला भावते.


दांडेली म्हणजे फक्त जंगल सफारी नसून वर म्हटल्याप्रमाणे अनेक साहसी खेळांसाठी प्रसिद्ध आहे.

दंतकथे प्रमाणे दान्देलाप्पा नावाचा मिराशी जमीनदारांचा सेवक जो अतिशय इमानदार व प्रामाणिक होता व ह्या प्रामाणिकपणामुळेच त्याने आपल्या प्राणांची आहुती दिली व ज्याला ह्या भागात देवासमान मानले जाते, त्याचे नाव ह्या जंगल भागाला देण्यात आले आहे. त्याचे देऊळ सुद्धा येथे बांधले आहे. दुसरी कथा सांगते दांडेली म्हणजेच महाभारतातील प्रसिद्ध दंडकारण्य. जेव्हा दंडकनायक नावाचा राजा ह्या जंगल भागातून चालला होता तेव्हा थोड्या काळासाठी येथे विसाव्यासाठी थांबला होता..हेच दंडकारण्य किवा दांडेली. अर्थात हे ऐकीव आहे. तसेही प्रत्येक ठिकाणाची काही तरी दंतकथा असतेच. तशी हि. पण दांडेली हा शब्द दान्द्वल्ली (हिरवा बांबू) पासून घेतला आहे.

आजकाल शिक्षण व उद्योगधंद्या मध्ये हि दांडेली अग्रेसर आहे. जसे कि plywood industry, paper industry etc. स्थानिक लोकां शिवाय बाकीचे सर्व लोक हे नोकरी धंद्या निमित्त वेगवेगळ्या राज्यामधून येऊन येथे वास्तव्य करत असल्यामुळे दांडेली ला ‘mini India’ असे हि संबोधतात. त्यामुळे अनेक भाषा येथे बोलल्या जातात जसे कि हिंदी, कन्नड, कोंकणी, मराठी, तेलुगु, तमिळ, आणि मल्याळम.

भेट देण्यासाठी उत्तम ऋतू

शक्यतो पावसाळा सुरु व्हायच्या आधी म्हणजे मे महिन्याच्या शेवट व जून च्या पहिल्या आठवड्यात अथवा हिवाळा उत्तम (मुसळधार पाऊस टाळावा कारण बरेच वेळा जंगल सफारी बंद असते).

दांडेली च्या अवतीभवती अनेक resorts, camps आहेत. Anshi-Dandeli Tiger Reserve, Kali Tiger Reserve, Anshi Nature Camp असे अनेक पर्याय आहेत. अर्थात Tiger Reserve असले तरी येथे इतरही विविध प्राणी, पक्षी दिसतात, जसे कि हत्ती, हरीण, अस्वल, चित्ता, अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी, तसेच जवळजवळ 300 पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी आढळतात. काली, कानेरी, आणि नागझरी ह्या नद्यांच्या अवतीभवती हे सर्व जंगल वसलेले आहे. तसेच जवळच Kadra नदीच्या backwarters चाही काही भाग जंगलात येतो. दांडेली पासून वरील सर्व ठिकाणे साधारण 40-45 kilometers आहेत.


Kulgi Nature camp हा नागझरी च्या दऱ्याखोर्या मधला एक मस्त trek आहे. दांडेली पासून 11 km. आहे. जंगलातील विविध पक्षी, झाडे, प्राणी पाहत पाहत हा trek खूपच enjoyable होतो. ह्याला timber trail trek हि म्हणू शकतो.


प्रसिद्ध Syntheri Rocks Kulgi Nature camp पासून साधारण 14 km आहे. हा एकच मोठा जवळजवळ 90 मी. उंचीचा दगड आहे, जो Kali नदी जंगलामधून वाहते तेथे नदीच्या पात्रात आहे व ज्याला Kali नदीच्या पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे अनेक वेगवेगळे नैसर्गिक आकार आलेले आहेत व त्यामुळे त्यात गुहा निर्माण झाल्या आहेत. पाण्याच्या वेगामुळे येथे अनेक छोटे मोठे झरे, धबधबे तळी तयार झाली आहेत. गुहांमध्ये शेकडो मधमाशा व त्यांची पोळी बघता येतात. काही ठिकाणी तर मध अक्षरशः खाली ठिबकत असतो. अतिशय प्रेक्षणीय जागा आहे.

कावालेश्वर मंदिर जे नागझरी Power House च्या विरुद्ध बाजूला अंबिकानगर मध्ये आहे (साधारण पणे हलीयाळ गावापासून 40 km), अतिशय दाट जंगलामध्ये, डोंगरावर वसलेले आहे. ह्यालाच Kavala Caves असे म्हणतात. Stalactite/Stalagmite खडकांपासून तयार झालेली ही गुहा आहे. गुहेच्या वरच्या दगडामधून पाझरणाऱ्या खनिजामुळे अनेक विविध कोनाकृती असे आकार ह्या गुहेत पहायला मिळतात, जसे बर्फाच्या गुहांमध्ये असतात तसे. स्थानिक लोक ह्याला शिवलिंग मानतात. हा सर्व भाग अतिशय जोरदार पावसाचा आहे.

तर असे best combination (wildlife, adventure, and sightseeing) असल्यामुळे आत्तापर्यंत आम्ही तीन वेळा दांडेली ला जाऊन आलो आहोत. Kingfisher stay, Kulgi Natural Camp अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहिलो आहोत. प्रत्येक ठिकाणाचे वैशिष्ट्य वेगळे. व प्रत्येक resort, jungle stay वाले जंगल सफारी व adventure games वेगवेगळ्याप्रकारे ठरवतात. पण Kingfisher stay चा अनुभव काही औरच. पावसाळा तोंडावर आला होता. जंगल भाग असल्यामुळे ह्या भागात लवकरच पावसाला सुरवात झाली होती. पण अजून पावसाने जोर धरला नव्हता. 2-3 दिवसाच्या मुक्कामात पहाटे जंगल सफारी व दुपारी स्थळ दर्शन व संध्याकाळी निवांत tent च्या बाहेरील व्हरांड्या मध्ये बसून जंगला मधील शांतता अनुभवणे हा आमचा रोजचा plan.

त्यामुळे आमची trip ची सुरवात जंगल सफारी पासून झाली. त्याचाच अनुभव वृतांत.

पहाटे लवकर उठून open jeep safari साठी आम्ही तयार झालो. दाट जंगलात जायचे असल्यामुळे बंदुकधारी forest workers प्रत्येक गाडीत असतात. दांडेली जंगलात विविध प्राण्यांचा वावर आहे.. वाघ, हरीण, अस्वल, रानगवे (Bison), black panther, leopards, तसेच विविध पक्षी, Hornbill (धनेश) इत्यादी. अर्थात ज्याचे नशीब त्यालाच ह्यांचे दर्शन मिळणार ना. आम्ही पहाटेच्या थंडगार हवेत सफारी ची मजा घेत फिरत होतो. आमचा guide बरीच माहिती देत होता. केवळ पाउल खुणांच्या आधारे तो सांगत होता कुठला प्राणी येथे येऊन गेला आहे वगैरे. आत्ता पर्यंत चा आमचा अनुभव असा आहे कि जंगल सफारी मध्ये इतर काहीं नाही तरी हरीण, ससे, मोर, हत्ती, इत्यादी प्राणी तर हमखास दिसतातच. तसेच आम्हालाही सर्वांनी दर्शन दिले इतकेच नव्हे तर फोटो साठी मस्त poses हि दिल्या. Malabar Pied Hornbills ची भरपूर घरटी झाडांवर दिसत होती व सुंदर Hornbills हि दिसत होते. ह्या पक्ष्यांच्या चोची खूपच वेगळ्या आकाराच्या असतात. खूपच देखणा पक्षी आहे. अजस्त्र असे रानगवे हि एका पाणवठ्या जवळ दिसले. हरीणांचे थवे तर अगदी गाडी जवळ धीटपणे येत होते. जंगली हत्तींचे कळप दिसले. अगदी छोटे पिल्लू सुद्धा पहिले. जंगल सफारी मध्ये काही ठिकाणी गाडी थोड्यावेळासाठी थांबवतात. कारण एक ठराविक waiting period घालवावाच लागतो प्राणी बघण्यासाठी. शेवटी जंगल राज !!! आपल्या हातात काही नसते. तरीही खूपच मजा आली. प्रदूषण नसलेल्या मोकळ्या हवेत बागडताना चे सुख काय सांगावे. पावसाळा असल्यामुळे सगळीकडे हिरवीगार दाट झाडी, त्यातही मोठमोठाली मसालेदार झाडे नव्हे तर वृक्ष च ... मसालेदार म्हणजे कढीपत्ता, इत्यादी, अक्षरशः आंब्याच्या झाडा एवढे कढीपत्याचे झाड .. कधीच असे पहिले नव्हते. शिवाय मिरीचा वेल, दगडफूल, हेही दिसताच होते जागोजागी. जोडीला शांतता (नाही म्हणायला वेगवेगळ्या प्राणी, पक्षांचे आवाज फक्त साथीला होते. धुके हि होतेच थोडेफार. अगदी भरभरून श्वास घेत होतो. तर अशी हि पहाटेची वेळ खूपच छान गेली.

दुपारच्या वेळेत जेवण उरकून sightessing साठी सज्ज झालो. दांडेली मध्ये वर नमूद केल्याप्रमाणे अनेक spots आहेत जे must visit आहेत. त्याच प्रमाणे आणखीही काही ठिकाणे म्हणजे: दान्देलापा temple जे वर सांगितल्या प्रमाणे आहे. नागजरी view Point, उलावी, मौलंगी, Supa Dam, Ganeshgudi, Shanmukha View Point, Vincholli falls, Magod falls, Tibetian Monastery अशी अनेक ठिकाणे आहेत. अर्थात एका दिवसात होत नाहीत बघून. त्यासाठी तीन दिवस तरी stay घ्यावा लागतो. सर्व ठिकाणे दांडेली पासून साधारण 15-40 kilometers अंतरावर आहेत.

तर अशी हि आमची जंगल सफारी शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपली असताना एका संध्याकाळी अगदी मुसळधार पावसाला सुरवात झाली. अगदी मोठमोठी झाडे काही ठिकाणी कोसळली होती त्यामुळे अनेक ठिकाणी lights नव्हते. Resort कितीही मोठे असले तरी जंगल भागात facilities ना काही मर्यादा येतात. त्यात वादळी पावसामुळे त्यामुळे त्यादिवशी lights येण्याची शक्यता संपलीच होती. सर्व बघून झाल्यामुळे नशीब कि आम्ही त्या संध्याकाळी resort मध्येच होतो. फक्त गंमत म्हणजे आम्ही त्या दिवशी tent stay घेतला होता. आणि नेमका त्याच दिवशी जोरदार पावसाला सुरवात झाली. त्यात सगळ्या tents ह्या main resort पासून थोड्या दूर होत्या. अर्थात तेथील लोकांनी आम्हाला हवे असल्यास rooms available केल्या होत्या पण आम्हालाच जरा हटके हवे होते त्यामुळे आम्ही व इतरही काही पर्यटक आपापल्या tents च्या बाहेर ओसरीवर खुर्च्या टाकून त्या तुफान पावसाचा अनुभव घेत होतो. Tents अतिशय भक्कम उभ्या केल्या असल्यामुळे काही भीती नव्हती. जंगलामध्ये अंधार अगदी लवकर होतो, ४-५ वाजताच कंदील लावले होते सोबतीला. अशातच रात्र होत आली, पावसाचा जोर काही कमी होईना. जंगल भागातला पाऊस च तो, अगदी रुद्रावतार होता. सर्वत्र गच्च अंधार, आणि नंतर जे काही आम्ही अनुभवले ते अगदीच नवे होते. पावसामुळे सर्वत्र बेडकांची फौज दिसत होती, अनेक विविध प्रकारचे कीटक, किडे, सर्वत्र संचारत होते, कंदिलाच्या उजेडात आम्हाला अतिशय भयंकर किडेही दिसले, अगदी भीतीने गाळण उडाली सर्वांची, तशातच अगदी समोर दाट जंगलात एकाएकी छोटे छोटे प्रकाश कण दिसू लागले, इकडून तिकडे जाणारे, पहिल्यांदा काहीच समजले नाही पण हळू हळू पूर्ण जंगलच प्रकाश कणांनी उजळले. जणू लखलखत्या ताऱ्यांचे तारांगण च. अर्थातच काजवे!!! पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात काजवे बघितले. आम्ही सर्व मंत्र्मुग्ध होऊन सर्वत्र पाहत होतो, डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय हे नक्कीच तेव्हा कळले. कितीतरी वेळ आम्ही सर्व लोक हा काजव्यांचा खेळ पाहत होतो. पाऊस तर मी म्हणत कोसळतच होता. दुसरया दिवशी सकाळी लवकर निघायचे असल्यामुळे व वातारणात भयानक गारवा आल्यामुळे आम्ही शेवटी अगदी नाईलाजाने tent मध्ये गेलो. तर असा हा दांडेली चा मुक्काम आम्हाला अगदीच अविस्मरणीय असा झाला हे खरेच.


कसे जाल?

पुणे-सातारा-कोल्हापूर-संकेश्वर-निप्पाणी-बेळगाव-दांडेली

अंतर- पुणे-सातारा - ११० कि.मी. सातारा-कोल्हापूर - १२३ कि.मी. कोल्हापूर-संकेश्वर-निप्पाणी - ३८ कि.मी निप्पाणी-बेळगाव - ७५ कि.मी बेळगाव-दांडेली - ८६ कि.मी


अर्थातच सलग जायचे नसल्यास मध्ये विश्रांती साठी stay घेऊ शकतो.


#jungle #Forest #Dandeli #travel #traveldiaries #beautiful37 views0 comments
bottom of page